[PDF] Vitamins Information in Marathi | जीवनसत्वाबद्दल संपूर्ण माहिती
Vitamins Information in Marathi | जीवनसत्वाबद्दल संपूर्ण माहिती
जीवनसत्त्वे (Vitamins) हे शरीराच्या आरोग्यासाठी थोड्या प्रमाणात लागणारे पण महत्त्वाचे पोषक घटक आहेत. ज्याची सगळ्या जीवांना अल्प प्रमाणात आवश्यकता असते, अशी ही जीवनसत्त्वे ही आहाराचे अंश आहेत. जीवनसत्त्वे ही कार्बनची संयुगे असतात. ही व्हिटॅमिन्स शरीरामध्ये निर्माण होऊ शकत नाहीत.
जीवनसत्वचे २ प्रकार आहेत
- जलविद्राव्य (पाण्यात विरघळणारी)– ब
- स्निग्ध विद्राव्य (स्निग्ध पदार्थात विरघळणारी ) – अ, ड, ई, आणि के ही जीवनसत्त्वे स्निग्ध विद्राव्य आहेत.
जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे
💠 जीवनसत्त्व अ – रेटिनॉल
💠 जीवनसत्त्व ब १ – थायमिन
💠 जीवनसत्त्व ब २ – रायबोफ्लोविन
💠 जीवनसत्त्व ब ३ – नायसिन
💠 जीवनसत्त्व ब ५ – पेंटोथेनिक ऍसिड
💠 जीवनसत्त्व ब ६ – पायरीडॉक्झिन
💠 जीवनसत्त्व ब ७ – बायोटिन
💠 जीवनसत्त्व ब ९ – फॉलीक ऍसिड
💠 जीवनसत्त्व ब १२ – सायनोकोबालमीन
💠 जीवनसत्त्व क – अस्कॉर्बीक ऍसिड
💠 जीवनसत्त्व ड – कॅल्सीफेरॉल
💠 जीवनसत्त्व ई – टोकोफेरॉल
💠 जीवनसत्त्व के – फायलोक्विनोन
जीवनसत्वाबद्दल माहिती व त्याच्या कमतरतेमुळे होणारे रोग
💠 अ-जीवनसत्त्व -Vitamin A हे जीवनसत्व आपल्या शरीराला लागणारे एक महत्वाचे जीवनसत्व आहे. हे जीवनसत्व पाण्यात विरघळणारे नसून ते मेदात विरघळणारे असे जीवनसत्व आहे.
व्हिटॅमिन अ हे जीवनसत्व जर लहानपणापासूनच आपल्या शरीराला योग्य प्रमाणात प्राप्त झाले तर पुढे त्याचे चांगले परीणाम दिसून येतात व त्याचा आपल्या शरीराला फायदाच होतो. दृष्टी चांगली राहण्यासाठी अ जीवनसत्वाची आवश्यकता तर असतेच परंतु हाडांच्या बळकटीसाठी ही हे जीवनसत्व फार उपयुक्त ठरते. हया जीवनसत्वामुळे शरीरातील जंतू संसर्ग पासून आपले संरक्षण होते.
➤ ➤ या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होणारा रोग – या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा येतो. रातांधळी झालेली व्यक्ती रात्रीच्यावेळी पाहू शकत नाही. हे संक्रामक रोगांपासुन संरक्षण करते. हे विटामिन शरीरात अनेक अंगाना सामान्य रूपात ठेवण्यात मदत करते जसे की त्वचा, केस, नख, ग्रंथि, दात, मसूड़े आणि हाडे.
💠 ब-जीवनसत्त्व -Vitamin B हे पाण्यात विरघळणारे असून त्याचे वेगळेपण हे आहे की हे जीवनसत्व बी हा 8 निरनिराळ्या जीवनसत्वाचा समूह आहे ज्यांची नावे वर दिलेली आहे. हया जीवनसत्वाच्या समावेशामुळे शरीरातील निरनिराळ्या पेशीमध्ये ऊर्जा निर्माण करण्यास मदत होते.
बी जीवनसत्व हे आपल्याला दैनंदिन जीवनात अनेक अन्नपदार्थातून मिळते. त्यात फळभाज्या, तांदळाचा भुसा, टोमॅटो, ताजी फळे, बटाटा, शेंगदाणे, यीस्ट, चणा, मका, कोबी, मासे, अंडी, हिरव्या पालेभाज्या, बीन्स, बदाम, अक्रोड व विविध वनस्पती बियाणे या सर्वांचा समावेश आहेत.
➤ ➤ या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होणारा रोग – या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे बेरीबेरी नावाचा आजार होतो.
💠 क-जीवनसत्त्व – Vitamin C हे अत्यंत महत्वाचे मानले जाणारे जीवनसत्व आहे. हे सी जीवनसत्व अनेक पदार्थांमध्ये आढळते. शरीरातील कार्यप्रणाली सुरक्षित ठेवण्यासाठी सी जीवनसत्वाची महत्वाची भूमिका असते.
शरीरातील अँटीऑक्सिडेंटचे कार्य व्यवस्थित ठेवण्यासाठी व शरीरात कोलाजीनची निर्मिती करण्यासाठी हया जीवनसत्वचा उपयोग होतो.
हे क जीवनसत्व लिंबुवर्गीय फळामध्ये भरपूर प्रमाणात आढळते. हे जीवनसत्व निसर्गत: आयसक्रोबिक आमलाच्या स्वरूपात आढळतात. लिंबुवर्गीय फळे, किवी, पेरू, ब्रॉकोली, ब्रसेल्स, स्ट्रॉबेरी यांच्यामध्ये आढळते. हे जीवनसत्व तोंडावाटे किंवा इंजेक्शनद्वारे ही घेतले जाते.
➤ ➤ या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होणारा रोग – या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे स्कर्व्ही नावाचा आजार होतो. हिरड्यांच्या रक्त पुरवठ्यात व वाढीत अडथळा येतो. जखमा भरून न येता त्यांत पू होतो.
💠 ड-जीवनसत्त्व – Vitamin D असे म्हंटले जाणारे हे जीवनसत्व हे ही शरीरातील महत्वाची कार्यें पार पाडण्यासाठी तेवढेच आवश्यक आहे. हे ड जीवनसत्व पाण्यात विरघळणारे नसून मेदात विरघळणारे आहे.
ड जीवनसत्व हे एक संप्रेरक ( हार्मोन ) असून ते आपले दात, मज्जातांतू, स्नायू व हाडे यांना बळ देण्यासाठी आवश्यक आहे. ड जीवनसत्वाचे मुख्य कार्य म्हणजेच शरीरातील आतड्यातून कॅल्शियम शोषून घेऊन ते हडत व दातात जमा करण्याची महत्वाची भूमिका हे जीवनसत्व निभावते.
ड जीवनसत्व हे मुख्यतः कॉड लिव्हर ऑइल, शार्क लिव्हर ऑइल यांच्यामधून मिळते. ड जीवनसत्व हे शाकाहारी पदार्थांपेक्षा मांसाहारी पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात आढळते.
➤ ➤ या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होणारा रोग – या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे हाडातील कॅल्शियम कमी होऊन हाडांची मजबुती कमी होते. त्यामुळे लहान मुलांमध्ये मुडदूस, हाडे कमकुवत होणे तर मोठ्यांमध्ये हाडे ठिसूळ होणे असे विकार होऊ शकतात.
💠 ई-जीवनसत्त्व – Vitamin E हे मेदात विरघळणारे जीवनसत्व असून ते पाण्यात विरघळले जात नाही. ई जीवनसत्व हे शरीरातील रक्तात लाल रक्तकोशिका Red Blood Cells बनवण्यासाठी उपयोगी असते.
त्याचप्रमाणे शरीरातील फँटी ऍसिडचे संतुलन व्यवस्थित ठेवण्यासाठी हे ई जीवनसत्व महत्वाचे असते. हे व्हिटॅमिन सेलचे अस्तित्व टिकविण्यासाठी महत्वाचे आहे. ई जीवनसत्व हे वनस्पती तेल, हिरव्या पालेभाज्या, अंड्यातील पिवळा बलक यामध्ये चांगल्या प्रमाणात आढळते.
➤ ➤ या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होणारा रोग – ई जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे वांझपणा, स्नायूचा अशक्तपणा, लाल पेशीचे विघटन, वारंवार गर्भपात होणे अश्याप्रकारचे दुष्परिणाम होऊ शकतात.
या जीवनसत्त्वाच्या वांझपणा, वारंवार गर्भपात, स्नायूंचा अशक्तपणा, लाल रक्तपेशींचे विघटन असे विकार होऊ शकतात.
💠 के-जीवनसत्त्व -Vitamin K हे अत्यंत कमी लोकांना माहीत असलेले परंतु तेवढेच उपयुक्त असे एक महत्वाचे जीवनसत्व आहे. याला फाइलोक्विनोन या नावाने ही ओळले जाते. पालक, ब्रोकली, कोबी , बीट यासर्वांमध्ये के जीवनसत्वाचे प्रमाण भरपूर असते.
के हे जीवनसत्व पाण्यात न विरघळता मेदात विरघळणारे आहे. आपल्या शरीरात जर एखाद्या वेळेस कोठेही जखम झाली तर त्यामधून होणारा रक्तस्त्राव थांबविण्याचे कार्य हे के जीवनसत्व करते परंतु जर एखाद्याच्या शरीरात के जीवनसत्वाची कमी असल्यास त्याला लागलेल्या जखमेतून होणारा रक्तस्त्राव हा न थांबता तो सतत सुरूच राहतो. म्हणजेच शरीरातील रक्त गोठविण्याच्या प्रक्रिया व्यवस्थितपणे करण्याचे कार्य के जीवनसत्व हे करत असते.
➤ ➤ या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होणारा रोग – या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया सुरळीत होत नाही. जखम झाल्यास तिच्यातून होणारा रक्तस्राव चालूच राहतो.