वाक्यांचे प्रकार | Sentence and Its Types in Marathi | Vakyache Prakar
वाक्याचे प्रकार (Vakyache Prakar) हा मराठी व्याकरणातील एक महत्वाचा टॉपिक आहे. मराठी व्याकरण हा सर्वच स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे विषय आहे. ह्या विषयाचा एकदा चांगला अभ्यास केला की मग पेपरच्या वेळेस फक्त रिवीजनावर भर द्यावी लागते कारण ह्यात गोष्टी सतत बदलत नसतात. संकल्पना क्लियर असल्या की मग सर्व सोप्पे जाते. इथे MPSC Alert वर आम्ही मराठी व्याकरणाची सिरिज सुरू करीत आहो ज्यात आम्ही संपूर्ण मराठी व्याकरण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. त्याच प्रमाणे स्पर्धांकुर हे आमचे युट्यूब चॅनेल आहे जिथे आम्ही मराठी ग्रामर आणि शब्दांवर व्हिडिओ टाकले आहे. ते आपण अवश्य पहावे.
वाक्य म्हणजे अर्थपूर्ण शब्दांचा समूह होय. प्रत्येक वाक्य हे शब्दांचे बनलेले असते. आपण जे वाक्य बोलतो ते वेगवेगळ्या प्रकारचे असते. व्याकरणात त्याला अत्यंत महत्व आहे. हेच वाक्यांचे प्रकार (Vakyache Prakar)आपण खाली बघणार आहो. मराठीत वाक्यांचे दोन प्रकारे वर्गीकरण केले जाते.
1) अर्थावरून पडणारे प्रकार.
2) स्वरूपावरून पडणारे प्रकार /वाक्यात असणाऱ्या विधानांचा संख्या वरुन पडणारे प्रकार.
1) अर्थावरून पडणारे प्रकार
विधानार्थी वाक्य :- या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात.
Ex.1) मी आंबा खातो.
2) गोपाल खूप काम करतो.
3) ती पुस्तक वाचत.
उद्गारार्थी वाक्य:- तुझ्या भारतातून मनातील उत्कट भावना व्यक्त केल्या जातात त्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात.
Ex.1) अब्ब !केवढा मोठा हा साप.
2) कोण ही गर्दी
3) शब्बास !UPSC पास झालास.
होकारार्थी वाक्य :- वाक्यातून होकार दर्शवला जातो त्याला होकारार्थी वाक्य असे म्हणतात.
Ex.1) मला अभ्यास करायला आवडते
2) रमेश जेवण करत आहे
3)मला Sti ची परीक्षा पास व्हायचे आहे
नकारार्थी वाक्य:- या वाक्यातून नका दर्शवला जातो तरी त्याला नकारार्थी वाक्य असे म्हणतात.
Ex.1) मी क्रिकेट खेळत नाही .
2)मला कंटाळा आवडत नाही.
प्रश्नार्थी वाक्य :- व्या वाक्यात कर्त्याने प्रश्न विचारलेला असतो त्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात.
Ex.1) तू जेवलास का ?
2) हे पुस्तक तुझे आहे का?
स्वार्थी वाक्य :- ज्या वाक्यातील क्रियापदा वरून केवळ काळाचा बोध होतो त्या वाक्याला स्वार्थी वाक्य असे म्हणतात.
Ex.1) मी चहा पितो.
2) मी चहा पिला.
3) मी चहा पिणार.
आज्ञार्थी वाक्य :- वाक्यांमधून आज्ञा ,आशीर्वाद, विनंती,उपदेश ,प्रार्थना इत्यादी गोष्टींचा बोध होतो त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात.
Ex.1) तो दरवाजा बंद कर (आज्ञा )
2) देव तुझे भले करो (आशीर्वाद)
3) कृपया शांत बसा (विनंती )
4) देवा मला पास कर (प्रार्थना )
5) प्राणी मात्रांवर दया करा (उपदेश )
विद्यर्थी वाक्य :- या वाक्यामुळे कर्तव्य , योग्यता, इच्छा,शक्यता,इत्यादी गोष्टींचा बोध होतो या वाक्याला विद्यार्थी वाक्य असे म्हणतात.
Ex.1) आई-वडिलांची सेवा करावी (कर्तव्य )
2) तू पास होईल असे वाटते (शक्यता )
3) ते काम फक्त सचिनच करु शकतो (योग्यता )
4) तू माझ्या सोबत यावे असे मला वाटते( इच्छा)
संकेतार्थी वाक्य :- जेव्हा वाक्यात एक गोष्ट केली असती तर दुसरी गोष्ट घडली असते असा संकेत दिला जातो तेव्हा त्या वाक्य असं संकेत आर्थी वाक्य असे म्हणतात.
Ex.1) जर चांगला अभ्यास केला असता तर पास झालो असतो.
2) पाऊस पडला तर पीक चांगले येईल.
3) जर काळे ढग आले असते तर पाऊस झाला असता.
2) स्वरूपावरून पडणारे प्रकार
केवल वाक्य:- या वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असते त्या वाक्याला केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतात.
Ex.1) राम आंबा खातो.
2)संदीप क्रिकेट खेळतो.
संयुक्त वाक्य :- जेव्हा वाक्यात दोन किंवा अधिक केवल वाक्य ही प्रधान सूचक उभयान्वयी अव्यययाने जोडलेले असतात त्या वाक्याला संयुक्त वाक्य असे म्हणतात.
Ex 1) विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली.
2) भारतात कला पैसा आला आणि बेकारीला सुरुवात झाली.
मिश्र वाक्य :- जेव्हा वाक्यात एक प्रधान वाक्य एक किंवा अधिक गौण वाक्य उभयान्वयी अव्यय आणि जोडलेले असतात या वाक्य मिश्र वाक्य असे म्हणतात.
Ex.1) नोकरी मिळावी म्हणून तो शहरात गेला.
2) तो शहरात गेला म्हणून त्याला नोकरी मिळाली
3) रोहित शर्मा चांगला खेळला म्हणून भारत जिंकला.