विधेयकांचा तुलनात्मक अभ्यास | Public Bill v/s Private Bill
🟣 सार्वजनिक विधेयक (Public Bill)
फक्त मंत्री संसदेत मांडतात.
सरकारी धोरणे प्रदर्शित करतात.
पारित होणे तुलनेने सोपे
विधेयक फेटाळल्यास संसदेचा सरकारवर विश्वास नाही, असा अर्थ होतो.
विधेयक मांडण्यापूर्वी 7 दिवसांची पूर्वसूचना द्यावी लागते. विधी खात्याशी चर्चा करून संबंधित खाते याचा मसुदा बनवते.
🟣 खासगी विधेयक (Private Bill)
खासगी (मंत्र्यांव्यतिरिक्त) सदस्य मांडतो.
सार्वजनिक मुद्द्याबाबत विरोधी पक्षाची भूमिका प्रदर्शित करतात.
पारित होणे तुलनेने अवघड असते.
विधेयक फेटाळण्याचा अर्थ संसदेचा सरकारवर अविश्वास असा होत नाही.
विधेयक मांडण्यापूर्वी एका महिन्याची पूर्वसूचना द्यावी लागते.
विधेयक तयार करण्याची जबाबदारी संबंधित सदस्याची असते.
सार्वजनिक व खाजगी विधेयक पारित मात्र सारख्याच पद्धतीने होतात.