Mira Bhayandar Jahirat 2025 | मीरा भायंदर महानगरपालिका जाहिरात 2025
मीरा भाईंदर महानगरपालिकेची 358 (Mira Bhayandar Jahirat 2025) पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्यात कनिष्ठ अभियंता, लेखापाल, उद्यान निरीक्षक, लेखापरीक्षक, ग्रंथपाल, फिटर अशा विविध 27 प्रकारच्या पोस्ट आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधीच आहे. जाहिराती संबंधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात आणि अर्ज कुठे करायचा ते सगळं खाली दिलेला आहे. मॉक टेस्टची तयारी आणि इतर तयारी करिता आपल्या MpscAlert या साइटवर बरेच मटेरियल आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचा अवश्य लाभ घ्यावा.
भरतीची महत्त्वाची माहिती (Mira Bhayandar Jahirat 2025)
- संस्था – मीरा भायंदर महानगरपालिका
- भरती वर्ष – 2025
- पदाचे नाव – खाली सविस्तर माहिती दिली आहे
- एकूण पदसंख्या – 358
- अर्ज पद्धत – ऑनलाईन
- अर्जाची सुरुवात – दि.22/08/2025 17.00 वा. पासून
- अर्जाची शेवटची तारीख – दि.12/09/2025 या दिवशी पर्यंत 23.55 वाजेपर्यंत
- अधिकृत वेबसाईट – mbmc.gov.in
पदांचा तपशील :-
अ.क्र. पदनाम वेतनश्रेणी (7 वा वेतन) पदसंख्या
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) S-13 35400-112400 – 27
- कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल) S-13 35400-112400 – 02
- कनिष्ठ अभियंता (विद्युत) S-13 35400-112400 – 01
- लिपीक टंकलेखक S-6 19900-63200 – 03
- सर्व्हेअर (सर्वेक्षक) S-8 25500-81100 – 02
- नळ कारागीर (प्लंबर) S-6 19900-63200 – 02
- फिटर S-6 19900-63200 – 01
- मिस्त्री S-6 19900-63200 – 02
- पंप चालक S-6 19900-63200 – 07
- अनुरेखक S-8 25500-81100 – 01
- विजतंत्री (इलेक्ट्रिशियन) S-6 19900-63200 – 01
- कनिष्ठ अभियंता (सॉफ्टवेअर ) /संगणक प्रोग्रामर S-13 35400-112400 – 01
- स्वच्छता निरीक्षक S-8 25500-81100 – 05
- चालक-यंत्रचालक S-8 25500-81100 – 14
- सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी S-13 35400-112400 – 06
- अग्निशामक S-7 21700-69100 – 241
- उद्यान अधिक्षक S-13 35400-112400 – 03
- लेखापाल S-13 35400-112400 – 05
- .19. डायलिसीस तंत्रज्ञ S-13 35400-112400 – 03
- बालवाडी शिक्षिका S-6 19900-63200 – 04
- परिचारीका/अधिपरिचारिका (स्टाफ नर्स नर्स मिडवाईफ)(G.N.M) S-13 35400-112400 – 05
- प्रसविका (ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ) (A.N.M) S-8 25500-81100 – 12
- औषध निर्माता औषध निर्माण अधिकारी S-10 29200-92300 – 05
- लेखापरीक्षक S-13 35400-112400 – 01
- सहायक विधी अधिकारी S-14 38600-122800 – 02
- तारतंत्री (वायरमन) S-6 19900-63200 – 01
- ग्रंथपाल S-13 35400-112400 – 01
एकुण – 358
शैक्षणिक अर्हता :-
- विविध पदासाठी विविध शैक्षणिक आहता दिलेली आहे ती बघण्याकरिता संपूर्ण जाहिरात डाऊनलोड करावी संपूर्ण जाहिरातीची डाउनलोडिंग लिंक खाली दिलेली आहे.
परीक्षा शुल्क
- अमागास : 1000/-
- मागास (OBC, SC, ST, NTA/B/C, SEBC, EWS, SEBC etc) : 900/-
परीक्षेचे स्वरुप व त्याअनुषंगाने सूचना :-


निवड पध्दत :-
i. परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. परीक्षेचे ठिकाण, दिनांक व वेळ ई-मेल किंवा एस.एम.एस (SMS) द्वारे संबंधित उमेदवारांना कळविण्यात येईल. तसेच मिरा भाईदर महानगरपालिका (Mira Bhayandar Jahirat 2025) अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्दीस देऊन माहिती कळविण्यात येईल. त्यामुळे अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनी वेळोवेळी संकेतस्थळावर भेट देणे आवश्यक राहील.
ii. पदास आवश्यक असलेली अर्हता अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही.
iii. वरील सर्व पदांसाठी मौखिक परीक्षा घेतली जाणार नाही. मात्र निवडसुचीतील उमेदवाराची व त्या उमेदवाराने सादर केलेल्या कागदपत्रांची सत्यता पडताळणीसाठी (KYC Verification) मुलाखत घेतली जाईल. (मुलाखतीसाठी कोणत्याही प्रकारचे गुण देय असणार नाहीत)
iv. शासन सामान्य प्रशासन विभाग निर्णय क्रमांक प्रानिमं 1222/प्र.क्र.54/का 13, दि.04 में, 2022 मधील तरतुदीनुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान 45 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
v. शासन, सामान्य प्रशासन विभाग निर्णय क्रमांक प्रानिमं 1222/प्र.क्र.54 का 13-अ दि.04 मे 2022 मधील तरतुदीनुसार गट-क मधील सर्व पदांकरीता मौखिक (मुलाखती) परीक्षा घेण्यात येणार नाहीत.
ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक :-
अ.क्र. तपशील दिनांक
- ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक – 22/08/2025 (17.00 पासून)
- ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक – 12/09/2025 (23.55 पर्यंत)
- ऑनलाईन पध्दतीने परीक्षा शुल्क भरणेची अंतिम मुदत – 12/09/2025 (23.55 पर्यंत)
- परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक – परीक्षेपूर्वी 7 दिवस
- ऑनलाईन परीक्षेचा संभाव्य दिनांक मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या http://www.mbmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असेल.
संपूर्ण जाहिरात : Download
ऑनलाईन अर्ज करा : Apply Online
मीरा भायंदर महानगरपालिका खालील पुस्तके नक्की अभ्यासा
संपूर्ण जाहिरात : Download
ऑनलाईन अर्ज करा : Apply Online


