वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय जाहिरात | DMER Advertisement 2023
DMER Advertisement: वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय यांच्या अधिनस्त शासकीय वैद्यकीय/दंत/आयुर्वेद/होमीओपॅथीक/महाविद्यालय व सलंग्नित रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य केंद्र विभागातंर्गत गट क परिचर्या, तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता स्पर्धापरीक्षेसाठी अर्हताप्राप्त उमदेवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. उमदेवारांची शैक्षणिक अर्हता, पदांचा तपशिल , शासनाच्या नियमानुसार संवैधानिक आरक्षण, व समांतर आरक्षण, स्पर्धा परीक्षेचा पदनिहाय अभ्यासक्रम आणि अर्ज करणेसाठी मार्गदर्शक सुचना इत्यादीची सविस्तर माहिती माहितीपुस्तिकेमध्ये नमूद करण्यात आलेली आहे.
ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक:
अ.क्र. | तपशिल | दिनांक |
---|---|---|
1 | ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक | १० मे, २०२३ |
2 | ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक | २५ मे, २०२३ |
3 | ऑनलाईन पध्दतीने सामायिक परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक | १० मे, २०२३ ते २५ मे, २०२३ |
4 | सामायिक परीक्षेकरीता प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक | www.med-edu.in |
5 | सामायिक परीक्षेचा दिनांक | वेळोवेळी माहिती मिळेल |
DMER Advertisement
वेतनश्रेणी :
०७ व्या वेतन आयोगानुसार त्या त्या पदासाठी निर्धारीत केलेली वेतनश्रेणी व अधिक नियमानुसार अनुज्ञये भत्ते
भरण्यात येणारी पदे :
- प्रयोगशाळा सहाय्यक 2. प्रयोगशाळा तंत्रज्ञ 3. ग्रंथपाल 4. स्वच्छता निरीक्षक 5. ईसीजी तंत्रज्ञ 6. आहार तज्ञ 7. औषध निर्माता 8. डॉक्युमेंटालिस्ट 9. समाजसेवा अधीक्षक १०. ग्रंथालय सहायक 11. व्यवसायोपचार तज्ञ 12. दूरध्वनी चालक 13. महिला अधीक्षिका 14. अंधार खोली सहाय्यक 15. क्ष किरण सहाय्यक 16. सांख्यिकी सहाय्यक 17. दंत आरोग्यक 18. भौतिकोपचार तज्ञ 19. दंत तंत्रज्ञ 20. सहाय्यक ग्रंथपाल 21. छायाचित्रकार 22. श्रवण मापक तंत्रज्ञ 23. विद्युत जनित्र चालक 24. नेत्रचिकित्सा सहाय्यक 25. डायलिसिस तंत्रज्ञ 26. शारीरिक शिक्षण निर्देशक 27. शिंपी 28. सहाय्यक दंत तंत्रज्ञ 29. मोल्ड रूम तंत्रज्ञ 30. लोहार 31. वाहन चालक 32. गृह नि वस्त्रपाल 33. क्ष किरन तंत्रज्ञ 34. सुतार 35. कातारी नि जोडरी