मुख्यमंत्री पदाबद्दल थोडक्यात माहिती | Information About CM Post
मुख्यमंत्री पदासाठी काही घटनात्मक तरतुदी :-
✍निवड / नियुक्तीची विशिष्ट पद्धत घटनेत सांगितलेली नाही.
✍ कलम १६४ : राज्यपाल मुख्यमत्र्याची नियुक्ती करेल
✍ संसदीय शासनप्रणाली च्या संकेताप्रमाणे विधानसभेतील बहुमत मिळालेल्या पक्ष नेत्याची मुख्यमंत्री पदी नियुक्ती करतात.
✍ स्पष्ट बहुमत नसल्यास राज्यपाल त्यांचा विवेकधिकर वापरून नियुक्ती करू शकतात.
विद्यमान मुख्यमंत्र्यांचे निधन होते तेव्हा:-
🔸मंत्रिमंडळ आपोआप विसर्जित होते
🔸नवीन मुख्यमंत्री नियुक्त होईपर्यंत राज्यपाल राज्याचा कारभार पाहतात.
🔸विधानसभेत बहुमतात असणारा पक्ष मुख्यमंत्री पदाचा साठी नवीन उमेदवाराचे नाव जाहीर करतात. राज्यपाल त्यांची निवड नवीन मुख्य मंत्री म्हणून करतात. विधानसभेच्या उर्वरित कार्यकाळासाठी नव्याने निवडून आलेले मुख्यमंत्री कामकाज पाहतात.
🔸 जर राज्यपालांनी नियुक्त केलेला मुख्यमंत्री कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल तर सहा महिन्याच्या आत निवडून येणे गरजचे असते.
🔸शपथ : राज्यपाल मुख्यमंत्र्याला पदाची आणि गुप्ततेची शपथ देतात.
🔸कार्यकाल : राज्यपालाची मर्जी असेपर्यंत. जोपर्यंत विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यां ना बहुमताचे समर्थन तोपर्यंत पदावरून दूर करता येत नाही.
मुख्यमंत्री पदशी निगडीत महत्वाची कलमे:-
१६३ : मंत्रिमंडळ
१६४: राज्यपाल मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती.
१६६ : राज्य सरकारचे कामकाज चालविणे
१६७: राज्यपालाला माहिती देण्यासंदर्भात मुख्य मंत्र्याची कर्तव्ये.
माहितीचा सोर्स :- https://www.facebook.com/Spardhankur/
mast
very useful info
Very useful information